नमस्कार!
मागील लेखानंतर हा लेख लिहायला खूपच कालावधी लागला. याबद्दल मी प्रथम दिलगिरी व्यक्त करतो आणि आता ज्या पद्धतीने आपण मागील लेखात आपल्या मूलभूत हक्कांची माहिती घेतली त्याच प्रकारे आपल्या संविधानात प्रत्येक भारतीय नागरिकांने पाळावी अशी मूलभूत कर्तव्य दिली आहेत. त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
ज्या पद्धतीने संविधानात संविधान तयार करतानाच घटनाकारांनी मूलभूत हक्क नमूद केले होते तसें मात्र मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत झाले नाही. कदाचित घटनाकरांना वाटेल असेल की भारतीय नागरिकांना आपल्या देशाप्रती असलेल्या कर्तव्यांची जाणीव असेल आणि ते आपणहुन ती अंमलात आणतील पण जेव्हा 1975-76 मध्ये आणीबाणी लागू केली होती या काळात मूलभूत कर्तव्यांची आवश्यकता व गरज निर्माण झाल्याने ती घटनेत स्पष्टपणे मांडण्यासाठी स्वर्णसिंग समिती 1976 मध्ये नेमली गेली.
या समितीने केलेल्या शिफारसीनुसार भारतीय संविधानात 1976 ला 42 वी घटनादुरुस्ती केली गेली आणि नवीन भाग 4अ तयार केला आणि याअंतर्गत कलम 51अ मध्ये 10 कर्तव्यांचा समावेश गेला. खरे पाहता स्वर्णसिंग समितीने फक्त 8 कर्तव्यांची शिफारस केली होती आणि यामध्ये देखील कर भरणे, कर्तव्ये पाळली नाहीत तर शिक्षेची तरतुद होती पण या समाविष्ट केल्या गेल्या नाहीत. 2002 मध्ये 86 वी घटनादुरुस्तीने ज्यावेळी 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्क केला तेव्हा याच घटनादुरुस्तीमध्ये 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी एका कर्तव्याचा समावेश केला. यामुळे सध्या आपल्या संविधानात एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत.
मूलभूत कर्तव्ये
1. घटनेचे पालन करणे व घटनेतील आदर्षांचा, राष्ट्रीय ध्वजाचा आणि राष्ट्रागीताचा आदर करणे.
2. स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेल्या उद्दात आदर्षांचा अभिमान बाळगणे व त्यांचे पालन करणे.
3. भारताचे सार्वभौमत्व, अखंडता व एकात्मता यांचे रक्षण करणे.
4. आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्राचे संरक्षण करणे आणि राष्ट्रीय सेवा बजावणे.
5. धार्मिक, भाषिक प्रादेशिक किंवा वर्गीय भेदभावांच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांमध्ये एकात्मता व बंधूभाव निर्माण करणे व महिलांच्या सन्मानाला बाधा आणतील अशा पद्धतींचा त्याग करणे.
6. आपल्या संमिश्र संस्कृतीचा वैभवशाली वारसा जतन करणे.
7. नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे व त्यात सुधारणा करणे आणि सजीव प्राण्यांविषयी दयाबुद्धी बाळगणे.
8. वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवता, जिज्ञासू वृत्ती आणि सुधारणावाद विकसित करणे.
9. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसेचा त्याग करणे.
10. व्यक्तिगत आणि सार्वजनिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठण्याचा प्रयत्न करून राष्ट्राची सतत उन्नती होत राहील, यासाठी प्रयत्नशील राहणे
11. पालकाने आपल्या पाल्यास वय 6 ते 14 पर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.
अशी 11 कर्तव्ये आपल्या घटनेत मांडली गेली आहेत. मूलभूत कर्तव्यांच्या समावेशाबाबत भारतीय संविधानाने पूर्वीच्या सोवियत रशिया कडून जरी प्रेरणा घेतली असली तरी सध्या जगात फक्त जपान आणि भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांची सूची आहे.

" मूलभूत कर्तव्यांमुळे लोकशाही बळकट होण्यास मदत होईल " असे मत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मांडले.
अशाप्रकारे आपण आपल्या मूलभूत हक्काबाबत जेवढे जागरूक आहोत तसेच आपण आपल्या मूलभूत कर्तव्याबाबत जागरूक असायला पाहिजे आणि आपल्या देशाचा विकास आणि गौरव घडवून आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असावे. कोणताही देश देशातल्या सुजाण नागरिकांमुळे मोठा होत असतो त्यामुळे आपण ही आपली कर्तव्ये पुरेपूर पाळून देशाचे एक सुजाण नागरिक म्हणून देश उन्नतीसाठी प्रयत्न करू..
मागील काही लेखापासून मी सतत घटनादुरुस्तीचा उल्लेख करतोय ही घटनादुरुस्ती नक्की असते काय? याची माहिती आपण पुढील लेखात घेऊ.
लेख आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा तसेच उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहचवा अशी नम्र विनंती.
लेख आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा तसेच उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहचवा अशी नम्र विनंती.
(Surajpadalkar1614@gmail.Com)
https://t.me/educationblogmarathi= telegram channel
जरूर भेट द्या.
धन्यवाद !
https://t.me/educationblogmarathi= telegram channel
जरूर भेट द्या.
धन्यवाद !