मागील लेखात आपण घटनानिर्मिती याबाबतची माहिती घेतली. या लेखात आपण आपल्या घटनेच्या सुरुवातीला असलेल्या सरनामा म्हणजेच उद्धेशीका याची माहिती घेणार आहोत.
सरनामा म्हणजे राज्यघटनेची प्रस्तावना किंवा सारांश होय. जगात सर्वप्रथम अमेरिकेच्या घटनेत सरनामा लिहिला आहे. त्यानंतर इतर देशांनी ही तिचे अनुकरण केले. तसेच भारतानेही सरनामा आपल्या घटनेत उद्धृत केला आहे. मागील लेखात आपण पहिले आहे. 13 डिसेंबर 1946रोजी पंडित नेहरू यांनी उध्दिष्टयांचा ठराव मांडला होता याच ठरावाची सुधारित आवृत्ती म्हणजे आपल्या घटनेचा सरनामा आहे.
आम्ही,भारताचे लोक, भारताला एक सार्वभौम,
समाजवादी,धर्मनिरपेक्ष,लोकशाही,गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक,आर्थिक व राजकीय न्याय,
विचार,अभिव्यक्ती,विश्वास,श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य,
दर्जाची व संधीची समानता,
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून, आमच्या संविधान सभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
हा आपल्या राज्यघटनेचा सरनामा आहे. हे आपणा सर्वाना माहिती आहे. संपूर्ण राज्यघटना अधिनियमित केल्यानंतर सरनामा अधिनियमित केला होता.
सरनाम्यात दुरुस्ती करण्याबाबत
1. ज्याप्रमाने राज्यघटनेमध्ये कालबाह्य झालेले कायदे रद्द करण्यासाठी तसेच नवीन कायदे समाविष्ट करण्यासाठी घटनादुरुस्तीची गरज असते. तसेच आपण सरनाम्यात दुरुस्ती करू शकतो का? याबाबत केशवानंद भारती खटल्यात(1973) सर्वोच्च न्यायालायने स्पष्ट केले कि "सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे यात दुरुस्ती केली जाऊ शकते पण अशी दुरुस्ती घटनेच्या मूळ भागाला (मूलभूत संरचनेला )धक्का न लावता केलेली असावी ".
2 .यानुसार 1976 ला 42वी घटनादुरुस्तीनुसार सरनाम्यात पहिल्यांदा दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीनुसार सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, आणि एकात्मता या तीन शब्दांचा समावेश करण्यात आला.
सरनाम्यातील महत्वाच्या संज्ञा
1. सार्वभौम =भारत हा कोणत्याही देशावर अवलंबून नाही किंवा कोणाची वसाहत नाही.भारत हे एक स्वतंत्र राष्ट्र आहे. आपले अंतर्गत आणि बाह्य व्यवहार करण्यास भारत समर्थ आहे. असा या शब्दाचा अर्थ होतो. भारत कोणत्याही देशाचे क्षेत्र अधिग्रहित करू शकतो किंवा आपले क्षेत्र दुसऱ्याला देऊ शकतो.
2. समाजवादी =भारतात लोकशाही समाजवादी प्रणाली आहे. यामध्ये मिश्र अर्थव्यवस्था असते आणि सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते.भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद आणि गांधीवाद यांचा मिलाफ असून गांधीवादाकडे झुकलेला आहे.
3. धर्मनिरपेक्ष =देशातील सर्व धर्माना समान दर्जा आणि समर्थन आहे. कोणताही एक धर्म अधिकृत धर्म नाही.
4. लोकशाही =लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय. लोकशाहीत जनता सार्वभौम असते. सर्वात श्रेष्ठ अधिकार जनतेकडे असतात.
5. प्रजासत्ताक =भारतात कोणत्याही विशेष वर्गाच्या हातात अधिकार नाहीत (राजेशाही ).भारताचा राष्ट्रपती जनतेद्वारे निवडला जातो. याविरुद्ध इंग्लड मध्ये राजा हा वंशपरंपरांगत राष्ट्रप्रमुख असतो.
6.न्याय =यात सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय येतात. हे न्यायचे आदर्श रशियन राज्यक्रांतीतून(1971) घेतले आहेत.
7.स्वातंत्र्य =व्यक्तीच्या व्यवहारावर निर्बंध नसणे आणि प्रत्येकाच्या व्यक्तिमत्व विकासाला संधी देणे. स्वातंत्र्याची शाश्वती मूलभूत हक्काद्वारे(याबाबत माहिती पुढील लेखात घेऊ ) दिली आहे.
8.समता =कोणत्याही घटकाला विशेष अधिकार नसणे आणि कोणताही भेदभाव न करता पुरेशा संधीची उपलब्धता असणे म्हणजे समता होय.धर्म, वंश, जात, लिंग, यावरून भेदभाव केला जाणार नाही असे सूचित होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आदर्श फ्रेंच राज्यक्रांतीतून (1789-1799)घेतले आहेत.
सरनाम्याबाबत मते
1. एम. एन. पालखीवाला ="सरनामा हे राज्यघटनेचे ओळखपत्र आहे "
2. के. एम. मुन्शी ="सरनामा लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे "
3. पंडित ठाकूरदास भार्गव ="सरनामा राज्यघटनेचा मूल्यवान भाग आहे.हा घटनेचा आत्मा आहे.ही घटनेची गुरुकिल्ली आहे."
**सर अर्नेस्ट बार्कर यांना भारताचा सरनामा एवढा भावला की त्यांनी तो आपल्या principal of social and political theory(1951)या पुस्तकात उद्धृत केला.
आपल्या राज्यघटनेने इतर देशाच्या घटनेतून घेतलेल्या तरतुदी खालील इमेज मध्ये पाहा.
अशाप्रकारे सरनाम्यात नमूद केलेल्या मूळ घटकावर आपली घटना आधारलेली आहे.
पुढील लेखात आपण संविधानाने आपल्याला दिलेले मूलभूत हक्क याबाबत माहिती घेणार आहोत. वरील माहिती आवडली असल्यास जरूर कळवा. प्रतीक्षा राहील.(surajpadalkar1614@gmail.com)
(लेखाची अपडेट्स मिळवण्यासाठी माझा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.(@educationblogmarathi)
धन्यवाद !

Nice 👍
उत्तर द्याहटवाNice Article...
उत्तर द्याहटवाVery useful information.....
Keep it up👍
उत्तर द्याहटवाखुप उपयुक्त माहिती..
उत्तर द्याहटवा